Public Safety Bill | जनसुरक्षा विधेयकाला विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंकडून विरोध
जनसुरक्षा विधेयक (Jansuraksha Vidheyak) विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र, आज विधानपरिषदेत हेच विधेयक मांडल्यावर ठाकरेंच्या पक्षाने त्याला विरोध केला. या विधेयकात नक्षलवाद (Naxalism) किंवा दहशतवाद (Terrorism) असा उल्लेख नाहीये, तसेच बेकायदा कृत्य (illegal acts) म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या देखील नाही, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंनी केला. "नक्षलवादाचा बीमोड करायचाय, दहशतवादाचा बीमोड करायचाय. परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसूद आहे, त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये," असे त्यांनी म्हटले. दरम्यान, विधानपरिषदेत महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) जनसुरक्षा कायद्याला विरोध केला. विधेयकाला असहमती दाखविणारे पत्र सभापतींकडे सादर करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत पलटवार केला.