पिंपरी-चिंचवड, पुणे : देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जाऊ शकतो. दुसरा कुठलाही पर्याय विरोधी पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील फॉर्च्युन हॉस्पिटलचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, 140 कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय आपल्या देशा मतदारांना घ्यायचा आहे. मला आता खात्री आहे या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिला पुढे जाऊ शकतो दुसरा कुठलाही पर्याय विरोधी पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यांना विरोध करण्याकरता त्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असंही ते म्हणाले.
मोदींसमोर 10 वर्षांचं व्हिजन
जनता अतिशय सुज्ञ विचारपूर्वक आहे. जागतिक पातळीवर या देशाचा नावलौकिक वाढवण्याच्या करता आणि या देशाचे नेतृत्व करण्यासाठई मोदी काम करत आहेत. 10 वर्षातला एक विजन डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री अजेंडा सेट केलेला आहे. सर्व क्षेत्रांमध्ये हा अजेंडा कायम होता. पुढे देखील पाच वर्षे राबवायचा आहे. देशातल्या जनतेला मोदी पंतप्रधान म्हणून मान्य आहेत. ते मोदीच पंतप्रधान म्हणतात, असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. बरेच दिवस त्यांची घालमेल सुरू होती, आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं असं अजित पवार म्हणालेत. काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो, आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतोचं पण लवकरच याबाबत निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड मध्ये थेरगाव इथ रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी ही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-