पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला, पुणे, या घटनानंतर आता दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण (Pune Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दौंड तालुक्यातील मळदमधील एका विद्यालयातील एका शिक्षकाकडून शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींना ब्लॅकमेल (Pune Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद गावातील एका खाजगी शिक्षण संस्थेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाकडून आठवीतील मुलींना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ कॉल केले जात होते. बापुराव धुमाळ नावाचा हा इंग्रजी विषयाचा हा शिक्षक मुलींसोबतचे हे अश्लील व्हिडिओ (Pune Crime News) कॉल रेकॉर्ड देखील करत होता. यातील एका मुलीने ही गोष्ट तीच्या पालकांना सांगितली. पालकांना धक्का बसला. त्यानंतर पालकांनी आधी ही बाब मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांच्या निदर्शनास आणून दिली.
मात्र, मुख्याध्यापक सुभाष वाखरे यांनी शाळेची बदनामी होईल या भितीनं ही बाब दडवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीसांना ही गोष्ट कळवली नाही. त्यानंतर देखील बापुराव धुमाळ मुलींना व्हिडिओ कॉल आणि मेसेज करत राहिला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अखेर दौंड पोलिसांकडे (Pune Crime News) तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला असता शिक्षक बापूराव धुमाळच्या मोबाईलमध्ये वर्गातील मुलींना केलेल्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डींग आणि मेसेजेस आढळले. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री एक वाजता शिक्षक बापुराव धुमाळला पोस्को कलमांच्या अंतर्गत (Pune Crime News) अटक केली आणि हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखरे यांना देखील अटक केली आहे. आज या दोघांना दौंड मधल्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो (Pune Crime News) काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे.
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.