पुण्यातील पुढील भागांमध्ये हा कर्फ्यु लावण्यात आला आहे.
खडक पोलिस स्टेशन हद्द
मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ वगैरे.
फरासखाना पोलिस स्टेशन
कागदीपुरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा,
स्वारगेट पोलिस स्टेशन
मीनाताई ठाकरे वसाहत कमान , महर्षी नगर ते गिरिधर भवन चौक
कोंढवा पोलिस स्टेशन
अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर चौक, भौरोबा मंदीर, ब्रम्हा एव्हीन्यू, गंगाधाम रोड
महर्षीनगर ते आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान पुण्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, कसबा, रास्ता या पेठा, स्वारगेट, गुलटेकडी, मार्केटयार्ड, खडकमाळ वगैरे भागांचा समावेश होतो. या भागात कोरोनाचे 37 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. तर कोंढवा भागात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. त्याचबरोबर हा सगळा परिसर दाट लोकवस्तीचा आहे.हा परिसर सील केल्यानंतर या भागातील कोणालाही या परिसरातुन बाहेर पडता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात जाता येणार नाही. या परिसरातील गल्ली- बोळातील सगळे रस्ते बॅरीकेडींग करुन सील करण्याच्या सुचना महापालिकेकडून पोलिसांना करण्यात आल्यात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती मात्र ठराविक कालावधीत या भागात जाऊ शकतील. या दोन भागांव्यतिरिक्त आणखी काही भाग अशाप्रकारे येत्या दिवसांमधे सील करावे लागू शकतात असं महापालिकेने म्हटलयं. त्यामुळे संपुर्ण पुण्यातील नागरिकांनी आठवड्याभरासाठी लागणारा भाजीपाला आणि किराणा आधीच खरेदी करावा अशा लेखी सुचना देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आलीय.
संबंधित बातम्या :
पुणेकरांनो आता बाहेर पडू नका! पुण्यातील अनेक भाग महापालिका सील करणार
Lockdown | लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर केंद्र स्तरावर मंथन सुरु
WEB EXCLUSIVE | कोरोना व्हायरसची साथ समजून घेताना...डॉ. संतोष गवळी यांचं विश्लेषण