11 आणि 13 ऑगस्टला कॉसमॉस बँकेतून 94 कोटी रुपये परदेशातील विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले. त्यासाठी मालवेअरच्या सहाय्याने आभासी स्विचींग सिस्टिम तयार करण्यात आली. या आभासी स्विचींग सिस्टिमने कॉसमॉस बँकेच्या ऑनलाईन सिस्टीमला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मागितली आणि कॉसमॉसच्या सिस्टीमने ती दिल्यानंतर पैसे बाहेरच्या देशांमध्ये वळते करण्यात आले.
मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे 28 देशांध्ये ज्या खात्यांमधून पैसे वळते करण्यात आले, त्या खातेधारकांच्या डेबिट आणि व्हिजा कार्डचे क्लोन तयार करुन, त्या आधारे पैसे काढण्यात आले. अवघ्या दोन तास तेरा मिनिटांमध्ये हे पैसे काढण्यात आले.
खासगी संस्थांची मदत
कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल डाटा गोळा करण्यात आला आहे. या सायबर हल्ला तपासणीसाठी काही खासगी संस्थाचीदेखील मदत घेण्यात येत आहे अशी माहिती विशेष पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली. कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात काही किरकोळ रिकव्हरी करण्यात आली आहे. जेव्हा सायबर हल्ला झाला तेव्हा मालवेअर फक्शनिंग अॅक्टिव्ह असल्यामुळे काही लोकांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं दिसत नाही. त्यातील किती ट्रानझॅक्शन कायदेशीर होते आणि किती बेकायदेशीर यांचा आमचा तपास सुरु आहे असं ब्रिजेश सिंह यांनी सांगितलं. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन 94 कोटी 42 लाख रक्कम लंपास केल्यानंतर आता तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरु आहे.
संबंधित बातम्या
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!
हॅकर्स बँकेवर दरोडा कसा टाकतात?
EXCLUSIVE पुणे | कॉसमॉस बँकेची खाती हॅक करण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात : अध्यक्ष मिलिंद काळे