पुणे : पुण्यातील 'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क' या संस्थेने त्यांच्याकडे असलेल्या मशीनच्या सहाय्याने कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच डीअॅक्टिव्ह करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मशीन कसं काम करतं याची माहिती मागवली असून या मशीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला असल्याचं या संस्थेचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी सांगितलं आहे.


पुण्यात संसर्गजन्य रोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये अशा चार मशीन बसवण्यात आल्याच 'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क' या संस्थेचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी सांगितलं आहे. हे मशीन नक्की कसं काम करतं आणि या मशीनच्या सहाय्याने कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याचा दावा नक्की कशाच्या आधारावर करण्यात येत आहे, हे जाणून घेण्यासाठी संस्थेचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्याशी बातचीत केली आहे.


कोरोना डिअॅक्टिव्हेट करणाऱ्या मशीनबाबत सांगताना संस्थेचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले की, हे सायट्रिक एरॉन जनरेटर आहे. यातून दर सेकंदाला जवळपास कोटी नेगेटिव्ह आयर्नन्स जनरेट होतात. हे निगेटिव्ह आयर्नन्स म्हणजे, ऑक्सिजन जनरेट होतो ज्याला नेगेटिव्ह चार्ज (o2-) असतो. हा नेगेटिव्ह चार्ज ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर हवेत तयार केला जातो. तो अतिशय क्षणिक असतो. तो फार काळ टिकत नाही. मात्र तो अतिशय अॅक्टिव्ह असतो. हवेतील मॉयश्चरशी तो रिअॅक्ट करतो. त्यातून तो हायड्रॉक्साइड आयर्न आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड असे दोन नेगेटिवन्ह आयर्न तयार करतो. हे दोन्ही आयर्न रिअॅक्टिव्ह असतात. निसर्गात त्यांना अॅटमॉस्फरीक डिटर्जेंट असं म्हटलं जातं. हे हवेतील धूळ, प्रदूषण, व्हायरस डिअॅक्टिव्हेट करतं.'


पाहा व्हिडीओ :  'कोरोना किलर मशीन' कसं काम करते?; सांगतायेत 'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क'चे महासंचालक



'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क' या संस्थेच्या महासंचालकांनी सांगितलं की, 'व्हायरस हा सजीव नाही. हा व्हायरस जर एखाद्या सजीवाच्या पेशीमध्ये गेला तरच तो अॅक्टिव्ह होतो.' संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झालं असतानाचं पुण्यातील 'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क' या संस्थेनं तयार केलेलं मशीन एक आशेचा किरण ठरणारं आहे. जीवघेण्या कोरोनाचा विषाणू मानवाच्या शरीरात जाण्याआधीच हे मशीन डीअॅक्टिव्ह करतं. त्यामुळे भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे मशीन अत्यंत उपयोगी ठरणार आहे.


दरम्यान, भारतात एकूण 606 कोरोना बाधित असून त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात आतापर्यंत चार जणांनी जीव गमावला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी : 
मुंबई शहर आणि उपनगर - 51
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1


संबंधित बातम्या : 


Coronavirus | रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह


देशभरातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा