या किट्सची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या किट्सच्या तुलनेत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीकडून या किट्सचा पुरवठा सुरुवातीला फक्त सरकारच्या आरोग्य विभागालाच करण्यात येणार आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल आणि कार्यकारी संचाकलक शैलेंद्र कवाडे आणि वितरण विभागाचे प्रमुख राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाची चाचणी देशात सुरू होणार आहे.
Coronavirus | मुंबईत चार तर सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 116 वर
कोरोना चाचणी किट्सचा तुटवडा
राज्यात कोरोना विषाणूचं संक्रमण झालेल्यांची संख्या वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. नाहीतर हा आजार आणखी वेगाने पसरण्याची भीती आहे. मात्र, कोरोना चाचणी किट्सचा तुटवडा असल्याने रोज काहीशेच चाचण्या करण्यात येतात. आता कोरोना चाचणी किट्स उपलब्ध झाल्यास या चाचण्या हजारांमध्ये घेणे शक्य होणार आहे. दरम्यान, कोरोना चाचणी करण्याची अद्याप कोणत्याही खासगी लॅबला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सध्यातरी सरकारी रुग्णालयामार्फत या चाचण्या होत आहे.
Coronavirus | कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभी करायचीय : मुख्यमंत्री ठाकरे
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीत समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 116 वर पोहचला आहे.
Corona Testing Kit | कोरोना व्हायरसचं तपासणी कीट विकसित, आयआयटी दिल्लीतील संशोधकांना यश