पिंपरी चिंचवड : पतीवर शस्त्रक्रिया झालेली असताना ही कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील एक नर्स कर्तव्य बजावत आहे. दोन्ही मुलांना हाताच्या अंतरावर ठेवत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना त्या सेवा देत आहेत.


47 वर्षीय नर्स मेघा सुर्वे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कार्यरत आहेत. 1996 पासून म्हणजेच गेल्या 24 वर्ष त्या कॅज्युअल्टी विभागातील रुग्णांना सेवा देत आहेत. कोरोनामुळे शहर संकटात आल्यावरही त्या इथे ही मागे नाहीत. रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, अहवालानंतर त्यांच्यावरील उपचार ठरवणे हे सगळं काम सध्या त्या करत आहेत. कोरोना योद्धा म्हणून त्या आपलं कर्तव्य पार पाडत आहेतच, पण पत्नी म्हणूनही त्यांचा लढा सुरु आहे. कारण त्यांच्या पतीवर शस्त्रक्रिया झाली आहे.


शस्त्रक्रिया झाल्याने पती गावी आहेत. अशा परिस्थितीतही त्या रुग्णसेवेत कर्तव्य बजावत आहेत. सध्या इथे मुलगा आणि मुलीसोबत त्या राहतात. शहरात कोरोनाने शिरकाव केल्यापासून त्या मुलांसोबत सोशल डिस्टन्स राखून आहेत. मुलगी स्वयंपाक बनवते तर यांचा मुक्काम हा घराच्या हॉलमध्ये असतो. "घरी जातो तेव्हा काळजी घ्यावी लागते. मी सध्या किचनमध्ये प्रवेशच करत नाही. माझा वावर फक्त हॉलमध्येच असतो," असं मेघा सुर्वे सांगतात.


एक किडनी फेल, आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस; तरीही मालेगावमधील पोलिसाचं कर्तव्याला प्राधान्य





पती आजारी, दोन्ही मुलं हाताच्या अंतरावर. पण याचं दुःख चेहऱ्यावर न दाखवता मेघा सुर्वे कोरोनाग्रस्तांना जीवदान देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. "नागिरकांनीही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. सरकारच्या नियमांचं, सूचनांचं पालन केलं तरंच हे लॉकडाऊन उठेल," अशी अपेक्षा मेघा सुर्वे यांनी व्यक्त केली.



त्यामुळे आता या भयाण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही जण घरात बसून त्यांना मदत शकत नाही, ही शरमेची बाब आहे.