Pune Crime news : रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर (crime) चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. वढू बुद्रुक गावाच्या हद्दीतील तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय 26, रा. पोखर भिटवा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा सहकारी समसुल अली अहमद खान (उत्तरप्रदेश) त्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या मालकीचा कंटेनर मयत शेजारी चालवत होता. तर आरोपी त्याचा सहकारी होता. 26 जानेवारी रोजी वडू बुद्रुक गावाच्या हद्दीत कंटेनरचा रस्ता चुकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने शहजाद याच्या डोक्यात मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने शहजाद याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून आरोपी पळून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. संजय रामफळ कालीरामना (वय 41, गुजरात) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
क्षृल्लक कारणावरुन हल्ल्यांमध्ये वाढ
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख गुन्हेगारीमुळे पुसट होत चालली आहे. पुण्यात क्षृल्लक कारणावरुन हाणामारी आणि हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने 'भाई' न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती आणि चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 36 वर्षीय संतोष साळवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन संकेत मारे ऊर्फ मेड्या, प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे, सोनू मारे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबतच महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विविध टोळ्या सक्रिय
पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे.