Ambadas Danve On CM Eknath Shinde : पुणे (Pune) आणि पिंपरी- चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) पोटनिवडणुकीत तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या, याची माहिती आमच्याकडे असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. तसेच, गुंडांची चौकशी झाली पाहिजे. सर्रास या गुंडाचा वापर निवडणुकीत होतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायच. सरकारच्या आशीर्वादाने पुणे पिंपरी चिंचवडमधील गुंड सक्रिय होतायेत, असेही दानवे म्हणाले. 


पुढे बोलतांना दानवे म्हणाले की,"भाजप आमदारच गोळीबार करतोय, ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्ष बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडा भेटतात, त्यामुळे याचे उत्तर देखील तेच देतील. तपासणी करून आतमध्ये सोडले जाते, तरीही आशाप्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पुण्यातील गुंडांच उदात्तीकरण केलं जातंय. हे चुकीचं आहे. असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांच आहे," अशी टीका दानवे यांनी केली. 


कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही


हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. कोणी म्हणतं यांचा बॉस वर्षा वर आणि कोणी म्हणतं सागर बंगल्यावर बसलाय. हेच लोकांना गोळ्या घालतायत, जीव घेतायत, गुंडांच्या गळ्यात गळे घालत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. केवळ राजकारणात गुंतलेले असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. 


मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक...


दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा दानवे यांनी केला. 


पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंच्या भेटीला 


पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा होता. अशात दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आधी पार्थ पवार गजा मारणेच्या घरी, आता अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला, अशी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी?