पिंपरी - चिंचवडबारामती लोकसभेनंतर (Baramati Lok Sabha)  पुण्यातील चिंचवड विधानसभेत गृहकलह निर्माण होऊ शकतो. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap)  यांच्या जागेवर दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे. पण लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी आहे, असं म्हणत मी आगामी चिंचवड विधानसभा (Chinchwad Vidhan Sabha Election)  लढणार असं ठामपणे अश्विनी जगताप म्हटलंय. त्यामुळं बारामतीतील पवार कुटुंबाप्रमाणे चिंचवडमधील जगताप कुटुंबात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा गृहकलह निर्माण होण्याची चिन्ह आहेत.


अश्विनी  जगताप म्हणाल्या, प्रत्येकाला  मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. ही लोकशाही आहे.  दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांची उत्तराधिकारी मीच दावेदार असणार आहे. साहेबानंतर मलाच पक्षाने मान दिला होता. त्यानंतर साहेबांची जी कामे अपूर्ण होती, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. शास्ती कर, कचरा डेपो, आयुक्तालयाचा प्रश्न असे बरेचसे प्रश्न मी सोडवले आहेत. माझ्या एक वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार आहे. 


वहिनींच्या मतदारसंघावर दिराचा दावा


भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या आमदार आहेत. मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे.  काही ही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार, असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केलाय. तर दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार  अश्विनी जगताप या देखील निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे भाजप आता कोणाला उमेदवारी जाहीर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


शंकर जगताप काय  म्हणाले?


वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे.  काही ही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार, असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केलाय. मात्र वहिनी अश्विनी जगताप रिंगणात असल्यावर ही तुम्ही लढणार का? हे येणारा काळ ठरवेल.मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे, असं म्हणत शंकर जगतापांनी संभ्रमावस्था ही कायम ठेवली आहे.


पोटनिवडणुकीला शंकर जगताप होते इच्छुक?


 दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यावेळी शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर होते.  मात्र  त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती.  


हे ही वाचा :


राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने?