वर्ल्डवाईड ऑईलफाईड मशिन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक आणि त्याच कंपनीचे सीएफओ मंगेश छत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यासह कात्रजमधील हुंदाई शोरुमचा मालक सत्येन गथानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे एफआयआरमधे सीबीआयने अज्ञात बँक अधिकारी असा उल्लेख करत गुन्हा नोंद केला आहे. सीबीआयच्या तपासात या तिघांना कोणत्या बँक अधिकाऱ्यांनी मदत केली, याचा उलगडा होऊ शकतो.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील पर्वती शाखेत वर्ल्डवाईड ऑईलफाईड मशिन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 15 लॉकर्स आहेत. या लॉकर्समध्ये दोन हजारच्या नोटेच्या स्वरुपात 10.69 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या लॉकर्समधून काही दिवसांपासून संशयास्पद व्यवहार होत असल्याचं बँकेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर बँक व्यवस्थापनाकडून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली.