Pune Breaking News : नारायणगाव : पुण्याच्या (Pune News) नारायणागावातून (Narayangaon News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब (Blood Samples Tubes) कालव्याच्याकडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारायणगावमधील पुणे नाशिक महामार्गलगत (Pune Nashik Highway) असणाऱ्या कालव्या लगत रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब टाकण्यात आल्या आहेत.
पाण्याच्या कालव्यालगत सापडलेल्या ब्लड सॅम्प्ल्सच्या ट्यूबमध्ये असलेलं रक्त पाण्यात जाऊन इतरांना त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. हा कालवा अनेक गावांना जोडतो, त्यामुळे हे दूषित झालेलं पाणी जर कोणी प्यायला, तर त्यामुळे विविध आजार उद्भवण्याचीही शक्यता आहे. त्यामळे या रक्ताच्या ट्यूब, अशा बेजबाबदारपणे कोणी टाकल्यात, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : Narayangaon Blood samples Test Tubes : पुण्यात रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल कालव्याच्या कडेला