पुणे : केंद्र सरकारने मागील 10 वर्षात पुण्यासाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्रातून चांगली मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) पुण्यात सभा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांची धोरणं ऐकून घेण्यासाठी पुणेकर कमालीचे उत्सुक आहे, असं पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati), शिरुर (Shirur), मावळ (Maval) आणि पुणे (Pune) लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा घेणार आहे. पुण्यातील रेस कोर्स मैदनावर या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले?
 


पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरंच काही देणार, असा विश्वास आहे. आज मोदींची पुण्यात सभा आहे ही पुणेकरांनी चांगली बाब आहे. पुणेकरांना मोदींना बघायला मिळणार आहे शिवाय त्यांना ऐकायलादेखील मिळणार आहे. या सगळ्यासाठी पुणेकर उत्सुक आहे. आतापर्यंतच्या सभेतली सगळ्यात चांगली आणि मोठी सभा आजची होणार असल्याचा दावा मुरलीधर मोहोळांनी केला आहे. 


पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा होत आहे. त्यामुळे चारही मतदारसंघातील महायुतीचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. शिवाय  जनतादेखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. साधारण दोन लाख लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा असल्याचं मोहोळांनी सांगितलं आहे. 


येणाऱ्या नागरिकांची योग्य प्रकारे सोय करण्यात आली आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. याची काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय ट्रॅफिक, वाहतुकीची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्थादेखील योग्य प्रकारे करण्यात आली आहे. नागरिकांना पाण्याची बॉटल आणि काळे कपडे घालण्यास मनाई आहे. त्यामुळे सभास्थळी पाण्याची सोय करण्यात आली आहे. 


भाजपकडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय मोदींसाठी भाजपकडून दिग्विजय योद्धा पगडी तयार करण्यात आली आहे. सभेच्या पूर्वी नरेंद्र मोदींचा जय्यत सत्कार करण्यात येणार आहे. त्यावेळी मोदींना ही पगडी प्रदान करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


PM Modi in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, हे रस्ते राहणार बंद


PM Narendra Modi Pagadi : चांदीच्या कोयऱ्या अन् डायमंडचा सूर्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात खास 'दिग्विजय योद्धा पगडी'