पुणे : देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेलेत, कारण भाजपा एक काम सांगता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी केली. शिरुर लोकसभेचे (Shirur Loksabha election ) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. 


पाटील पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कोरोनाच्या काळात मोदींनी लस काढली आणि त्या लसीमुळे लोकांचे  प्राण वाचले आणि म्हणून कोरोना लसीकडे पाहून मोदींना मत द्या. आता त्यांनी लस काढली, आपले प्राण वाचले म्हणून मते यांना द्या तर मग हाच फॉर्मुला असेल तर काँग्रेस पक्षाने पूर्वी पूर्वी पोलीओची लस काढलेली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत दिले पाहिजे.


देशात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर, 18% चा जीएसटी हे लोक 21 टक्के करतील. पेट्रोलची किंमत 105 रुपयांवरून 115 रुपये करतील तर डिझेलची किंमत 110 रुपये करतील आणि गॅस सिलेंडर 1500  रुपयावर नेतील. भारतावर 210 लाख कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवलेलं आहे हे 210 लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे असे आवाहन पाटील यांनी केलं.



तर शिरुरची जनता शांत बसणार नाही; अमोल कोल्हे


याच सभेत अमोल कोल्हेंनीदेखील सरकारवर निशाणा साधला आणि अजित पवारवरदेखील निशाणा साधला. ते म्हणाले, की तुमच्या सांगण्यावरुन भूमिका बदलली नाही, स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून निधी अडवला असले तर शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. पराभव समोर दिसायला लागल्यावर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस कसा गडबडतो, याच वैषम्य  वाटत. हेच गावागावात जाऊन विचारत आहेत, तुमच्या गावात खासदाराने निधी दिला का? पण आज त्यांनीच उत्तर दिलं, की विरोधी पक्षातले खासदार होते म्हणून निधी दिला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. 


इतर महत्वाची बातमी-


माहेरवाशीण लेकीला साडी चोळी करा पण बटण दाबायच्या भानगडीत पडू नका; अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा


Amol Kolhe And Ajit Pawar : अमोल कोल्हेंचे अजित पवारांना धडाधड प्रश्न, म्हणाले दादा सांगा बेरोजगारी…