पुणे : पुण्यात सध्या शाळकरी मुलांसोबत (Pune Crime News)आमानुष प्रकार सुरुच आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नदीपात्रात 16 वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याची विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अन्सू शर्मा (वय 19, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता. महिलेच्या मुलाने मारहाण करण्यास काही जणांना पाठविल्याचा शर्मा याचा समज झाला होता. या कारणावरून शर्मा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी 16 वर्षीय मुलाला डेक्कन परिसरातील नदीपात्रात नेले. तेथे त्याला पट्टा आणि बांबूने मारहाण केली. नदीपात्रात त्याला विवस्त्र करण्यात आले. मोबाइलद्वारे चित्रीकरण करून समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्यात आली. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमच्या समाजाच्या समूहावर चित्रफीत प्रसारित करण्यात येईल, अशी धमकी आरोपींनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, डेक्कन पोलीस तपास करत आहेत.
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण
कालच वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेत घडला होता. या प्रकारामुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शिक्षिकेला काही शिस्त आहे की नाही, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. विद्यार्थी घोळका करून बसले असताना वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेतून समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा मारहाण करताना प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. पूजा केदारी असं शिक्षिकेचं नाव आहे. या पूजा केदारी यांनी मुलाला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली होती.
इतर महत्वाची बातमी-
Pune Weather Update : उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता