देहू, पुणे : पुण्यात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी (Bageshwar Dham Dhirendra Shastri) देहूत संत तुकाराम महाराजांचं (sant Tukaram Maharaj) दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी रोष व्यक्त केला होता. त्या प्रकरणानंतर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात माफीदेखील मागितली आहे.
काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
'संत तुकाराम महाराजांबद्दल मी केलेलं वक्तव्य चुकून झालं होतं. भारतात संतांची परंपरा आहे. तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो. त्यावेळी वारकऱ्यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. या तुकाराम महाराज मंदिरांच्या विश्वस्त आणि बाकी लोकांनी वारकरी सांप्रदायाचं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घडवलं या परंपरेची ओळख करुन दिली. याच संतांचा आशीर्वाद जर भारताला मिळत राहिला आणि शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्य स्थापनेचा संकल्प संपूर्ण भारतात पूर्ण केला जाईल आणि भारत हिंदू राष्ट्र बनेल', असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संगाला मोठी गर्दी...
धीरेंद्र शास्त्रींचं पुण्यात सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस पुण्यात त्यांच्या या सत्संगाला पुणेकरांनीच नाही तर राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. धीरेंद्र शास्त्रींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी होत असते. त्याच प्रमाणे पुण्यातील कार्यक्रमातदेखील रोज भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. याच दरम्यान त्यांनी देहूचं दर्शन घेतलं आणि तुकामार महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याता प्रयत्न केला आहे.
काय होता नेमका वाद?
धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांसंदर्भात काही दिवसांपू्र्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ते 17 व्या शतकातील संत तुकारामावर टीका केली होती, त्यांची पत्नी त्यांना दररोज मारहाण करत असे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर वारकरी सांप्रदाय चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वारकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप वारकऱ्यांनी त्यांच्यावर तेला होता. यावरून वाद वाढल्यानंतर शास्त्री यांनी माफी मागितली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या वादावरुन माफी मागितली आहे.
इतर महत्वाची बातमी-