पुणे : ऑनलाइन पेमेंट कंपनीची 3.5 कोटींची (Pune Crime) फसवणूक करणाऱ्या 2 सायबर  (Pune Crime News)  चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची  (Cyber Crime)सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. (Easy pay campany) कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक झाली होती. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि आयुब बशिर आलम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इझी-पे चे नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. या कंपनीतील नोंदणीकृत एजंटांपैकी 65 जणांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅपव्दारे कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले होते. आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी 52 लाख 70 हजार रुपयांची रक्कम इतर 44 बँक खात्यांत जमा करून फसवणूक केली. याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता


या प्रकरणी सायबर पोलिसांनी 2 आरोपींना आधीच अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुणे सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. परंतु आरोपी दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा माग काढत अन्सारी आणि आलम या दोघांना कोलकतामधून ताब्यात घेतले. न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट


 मागील काही वर्षांपासून पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट दिसत आहे. मागील वर्षभरापासून अनेकांना ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात  फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.  गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग  अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात सायबर गुन्हे थांबवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. 


पुणे शहरात या आठ महिन्यात गुन्ह्यांचे प्रकार काय?


मनी ट्रान्स्फर: 56
केवायसी अपडेट: 42
क्रिप्टोकरन्सी: 58
इन्शुरन्स फसवणूक: 10
जॉब फसवणूक: 31
शेअर मार्केट फ्रॉड: 27
लोन फ्रॉड: 29
ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉड: 62
फेक प्रोफाईल: 85
फेसबुक हॅकिंग: 34
सेक्सटॉर्शन: 35


इतर महत्वाची बातमी-


आधी सुनावणीला उशीर अन् नंतर सूरत-गुवाहाटीच्या प्रश्नांना बगल; "मी कुठे गेलो, कुठे राहिलो, सांगणार नाही"; कामतांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास लांडेंचा नकार