पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं आहे. दीड महिन्यांपूर्वी अश्विनी जगतापांनी शरद पवारांसोबत याबाबत संवाद साधल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) हे वेळोवेळी नाकारत आल्यात, याबाबत त्या कॅमेऱ्यासमोर ही प्रतिक्रिया देणं टाळतात. मात्र, भाजपकडून त्यांचे दिर आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. याची कुणकुण अश्विनी जगतापांना (Ashwini Jagtap) लागल्यामुळं त्या तुतारी फुंकू शकतात, अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी झालेल्या पोट निवडणुकीत अश्विनी जगताप आमदार झाल्या, मात्र तेंव्हा त्यांचे दिर शंकर जगताप ही देखील इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी शंकर जगतापांना थांबण्याची आणि पुढं तुम्हाला संधी देऊ. असा शब्द दिला होता, असं नेहमी बोललं जातं. ती संधी या विधानसभेत शंकर जगतापांना मिळणार, असंच सध्याचं चित्र आहे.
हे अश्विनी जगतापांना (Ashwini Jagtap) लक्षात आल्यानं त्या त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन, करू शकतात अशी चर्चा सध्या शहरभर रंगलेली आहे. त्यांच्या समर्थकांसह अश्विनी जगताप राष्ट्रवादीचं दार ठोठावत आहेत, शरद पवार त्यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात प्रवेश देण्याबाबत विचार करू शकतात आणि कदाचित दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळू शकते.लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातमध्ये दोघांना तिकीट मिळणं अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जाते.
चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विजयी
लक्ष्मण जगताप आमदार असताना त्यांचं निधन झालं, त्यानंतर पार पडलेल्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भरघोस मतांनी चिंचवडकरांनी निवडून दिले. आता मात्र या जागेसाठी एकाच कुटुंबातील दोन जण इच्छुक असल्याने पक्षासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे अश्विनी जगताप वेगळा विचार करण्याची तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अश्विनी जगताप यांनी 'तुतारी' हाती घेतली तर कुटुंबात लढत
अश्विनी जगताप यांनी वेगळा विचार करत 'तुतारी' हाती घेतली तर या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. दीर आणि भावजय म्हणजेच अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु अश्विनी जगताप यांना उमेदवारी न दिल्यास त्या तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोठे बदल होण्याची शक्यता आहे.