Ashadhi Wari 2022: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. काटेवाडीतील पाहुणचार आटवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सनसर मध्ये रात्री मुक्काम केला. मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते. सुरुवातीला विणेकरी.. टाळकरी..त्यानंतर मृदंगवाले त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदर्शना घातली आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे आश्व याच ठिकाणाहून धावले आणि एकच ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष झाला.
विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज दौंड तालुक्यातील सनसर मुक्काम असणार आहे.
राधाकृष्ण विखेंनी स्पष्टच सांगितलं, 'आषाढीची पूजा फडणवीसच करतील'
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा भाजपला मिळाला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झालं आणि आज तेच विश्वासघाताची भाषा करत आहेत. त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे ते आता सत्तेतून पायउतार होतील असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे आणि येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्ताने भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दोन वर्षांनी निरा स्नान अन् लाखो वारकरी
कोरोनामुळे दोन वर्ष पायी वारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. प्रत्येक गावातील लहान-मोठे वारकरी अगदी उत्साहाने वारकऱ्यांची सेवा करत आहे. पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दीदेखील होत आहे. दिवे घाटाचा पालखीचा कठीण टप्पा पार केल्यानंतर पालखी जेजूरीत थांबते. जेजूरीकरांनी देखील यंदा जोमात पालखीचं स्वागत केलं. भंडारा उधळत अभंगाच्या तालावर ताल धरला. पायी वारी होत असल्याने वारकरी आणि नागरिक आनंदी आहे. वाल्हेतील मुक्काम संपवून वारी लोणंदच्या दिशेने रवाना होईल. त्यापुर्वी पादुकांना निरा स्नान घातलं जातं. यात तिरावर अनेक वारकऱ्याांनी अभंग गात स्नानाचा आनंद तुटला.