MM Naravane At Passing Out Parade : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं (एनडीए) आज, शुक्रवारी दीक्षांत संचलन झालं. पुण्यातील एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न झाला. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे (Army Chief General MM Naravane) यांनी दीक्षांत संचालनाची मानवंदना स्वीकारली.एनडीएतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर 141 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे.
लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यातून घडतं. लष्करी हेलिकॉफटर्स तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण असतं. एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेट्सचा याप्रसंगी पदकं देऊन गौरव करण्यात येतो. दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेट्ससाठी (स्नातक) स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो. इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. देशवासीयांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर दीक्षांत सोहळा खाकी गणवेशात पार पडत होता. पण कालांतरानं यामध्ये बदल झाला. 1969 पासून उन्हाळ्यात पांढरा आणि हिवाळ्यात निळ्या रंगाच्या गणवेशात असे वर्षातून दोनदा दीक्षांत सोहळ्याची परंपरा सुरू झाली. गेल्या 50 पेक्षा जास्त वर्षांपासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून दर्जेदार अधिकारी तयार झाले आहेत. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये अनेक बदल झाले आहेत. 36 व्या तुकडीतील जनरल व्ही. के. सिंग लष्करप्रमुख झाले.
हेही वाचा :
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
शाळेत मारहाण केल्याचा बदला तब्बल घेतला सोळा वर्षांनी , रस्त्यात गाठून तरुणाला बेदम मारहाण