Pune Anushka Parekh Record: 'हौसले बुलंद हो तो मंजीले दूर नही होती", हे वाक्य जगणारी आणि जगवणारी पुण्यातील 19 वर्षीय अनुष्का वैभव पारिख हिने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 19 वर्षीय अनुष्का वैभव पारीख हिने 5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या पार करून विश्वविक्रम रचला आहे.
2018 मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचे नाव लौकिक मिळवणारी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुष्काने पुन्हा एकदा तिची जिद्द दाखवून दिली आहे आणि 5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या पार करून कमीत कमी वेळेत सर्वात वजनदार डेडलिफ्ट करणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी बनली आहे. तिचे नाव इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. अनुष्का, MIT-WPU मधील TY BA लिबरल आर्ट्सची विद्यार्थिनी आहे.
अनुष्काने वर्ल्ड बुक्सच्या ऑनलाइन जागतिक स्पर्धेत भाग घेतला ज्यामध्ये सहभागी वजन उचलण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अर्ज करु शकतात. सहभागींना एक फॉर्म भरावा लागतो आणि रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. एकदा नोंदणी केल्यानंतर सहभागींनी पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी किमान सेकंदात उचललेल्या वजनाची महिती द्यावी लागते. ज्याचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीद्वारे परिक्षण केलं जातं. याच स्पर्धेत 55-60 किलो वजनी गटात सहभागी होत अनुष्काने अवघ्या 5 सेकंदात 100 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले.
गेल्या दीड वर्षापासून मी वजन उचलत आहे. माझ्याकडे डेडलिफ्टमध्ये 90 किलोचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे, जो 2021 मध्ये इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये वैशिष्ट्यीकृत झाला आहे. हा पराक्रम 9.25 सेकंदात झाला होता. तिने जिल्हा, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला असला आणि विविध प्रकारांतर्गत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले असले तरी तिने आता 110 किलो डेडलिफ्ट करण्याचा निर्धार केला आहे जे तिला 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत करायचा आहे, असं ती सांगते. माझ्या जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रम केलेल्या खेळाडूंसोबत मी गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धेची तयारी करत होतो. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आम्ही फेडरेशनद्वारे अर्ज करण्यास सुरुवात केली होती, असंही ती आत्मविश्वासाने सांगते.
माझी आईच मला सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. मी माझी आई शिल्पा पारीख यांच्याकडून प्रेरित आहे जी स्वतः पॉवर-लिफ्टर आणि फिटनेस उत्साही आहेत. त्यासोबतच कुटुंबीयांच्या आणि मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळेच मी हे करु शकले. याचं सर्व श्रेय त्यांना जातं असं तिने सांगितलं आहे.