Pune : सध्या रस्त्यावर गर्दी करुन बर्थडे (Birthday) साजरा करण्याचा प्रकार वाढलाय. अनेक तरुण रस्ता अडवून बर्थडे (Birthday) साजरा करताना दिसतात. पुण्यात (Pune) एक निराळाच प्रकार समोर आलाय. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीचा बर्थडे (Birthday) जनवाडी येथील तरुणांनी रस्ता अडवून आणि दुचाक्या उभ्या करुन साजरा केला. या प्रकरणी बर्थडे साजरा करणाऱ्या तुरुणांवर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून त्यांची पोलिसांनी धिंड काढली. 


याबाबत अधिकची माहिती अशी की, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पुण्यातील येरवडा (Yerawada) येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या आरोपीचा बर्थडे (Birthday) जनवाडी येथील तरुणांनी रस्त्यात साजरा केला. भाई तरुंगात असताना परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. वाढदिवसासाठी आणलेला केक खास होता. येरवाडा तुरुंगाची आणि शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची केकवर प्रतिकृती उभारण्यात आली होती. बर्थडे साजरा करताना तरुणांनी रस्त्याच्यामध्ये गाड्या उभ्या केल्या. तलवारीने केक कापण्यात आला. शिवाय ,बर्थडेसाठी गर्दी करुन रस्ताही बराच काळ अडवून ठेवला. दरम्यान या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली आहे. 


रस्ता अडवणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई (POLICE)
 


रस्ता अडवून आणि दुचाक्या उभ्या करुन बर्थडे (Birthday) साजरा करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली. पुण्याच्या जनवाडी परिसरातला हा घडला. पुण्याच्या जनवाडी परिसरातला रात्री बारा वाजता काही तरुण वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस ज्याचा साजरा केला तो मात्र जेलमध्ये होता. मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. अशा तरुणाचा बर्थडे मात्र थाटात साजरा केला गेला. पोलिसांना माहिती मिळताच तरुणांवर कारवाई करण्यात आली. 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये (Viral Video)


रस्ता अडवून आणि तलवारीने केक कापत साजरा करण्यात आलेल्या बर्थडेचा व्हिडिओ (Viral Video) करण्यात आला होता. हा व्हिडिओ संबंधित तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत देखील पोहोचला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. यानंतर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे रस्ते अडवून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना कारवाईची भीती सतावेल, असे म्हटले जात आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Atal Setu : पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या केबलचा वापर, सर्वात मोठा समुद्री पूल; शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये आहे तरी काय?