Whatsapp Wishes strickers : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे लोक व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम ,टेलिग्राम ,फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छांचे मेसेज, स्टिकर्स, GIF आणि अशा बऱ्याच गोष्टी शेअर करतात. त्यातील व्हॉट्सॲप हा लोकांनी अधिक पसंती दिलेला मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.व्हॉट्सॲप स्वतः असे स्टिकर्स स्वतःहून बनवत नसले तरी ते युजर्सना थर्ड-पार्टी स्टिकर्स ॲप वापरण्याची करण्याची परवानगी देते. तुम्हालासुद्धा तुमच्या मोबाईलवरून अशा सणांच्या अनेक शुभेच्छा पाठवायच्या असतील तर व्हॉट्सॲप स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन एक ॲप डाउनलोड करा.
व्हॉट्सॲपवर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कशा पाठवाल ?
व्हॅट्सॲपवरील मकर संक्रांतीचे थीम असलेले स्टिकर्स डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करावे लागेल. या प्रक्रियेच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यावर तुम्हाला शेवटी मकर संक्रांतीच्या थीमचे स्टिकर्स डाऊनलोड करता येतील आणि तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवता येतील. चला तर मग जाणून घेऊया ही संपूर्ण प्रक्रिया...
-तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
-वरच्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन लोहरी व्हॉट्सॲप स्टिकर्स म्हणून सर्च करा.
-तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका स्टिकर्स ॲपवर जा आणि तो इन्स्टॉल करा.
-आता ते ॲप तुमच्या मोबाईल ध्ये डाऊनलोड होईल यानंतर तो टॅब करून ओपन करा.
-प्लस आयकॉन किंवा ॲड बटनावर टॅप करून तुम्हाला व्हॉट्सॲप मध्ये कोणते स्टिकर्स वापरायचे आहेत ते स्टिकर पॅक तुम्ही आता निवडा.
-आता व्हॉट्सॲप ॲप ओपन करा.
-आता तुमच्या कोणत्याही एका प्रिय व्यक्तीला किंवा एखाद्या ग्रुपवर तुम्हाला स्टिकर्स शेअर करायचे असेल त्याची वैयक्तिक चॅट किंवा त्या ग्रुपची चॅट ओपन करा.
-टायपिंग बॉक्समधील इमोजी ऑप्शनवर टॅप करा.
-बॉटम बारमध्ये असणाऱ्या GIF मधील स्टिकर्स आयकॉनवर टॅप करा.
-तुम्ही निवडलेले स्टिकर्स पॅक तिथे तुम्हाला दिसेल.
-आता तुम्हाला जे स्टिकर्स शेअर करायचे आहे त्याच्यावर टॅप करा.
आयफोन वापरणाऱ्यांनी काय करायचं?
Apple च्या IPhone मध्ये युजर्सना कोणताही थर्ड-पार्टी ॲप वापरून व्हॉट्सॲपमध्ये थेट स्टिकर्स जॉईन करण्याची परवानगी नसते. जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि तुम्हाला असे स्टिकर्स तुमच्या प्रियजनांना पाठवायचे आहेत तर मात्र तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन असलेल्या मित्राची मदत घेऊ शकता. ते तुम्हाला जे स्टिकर्स पाठवतील आणि नंतर ते तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये डाऊनलोड करून तुम्ही ते फॉरवर्ड करू शकता.
इतर महत्वाची बातमी-