Ajit Pawar Meets Dilip Walse Patil : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रकृतीची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारपूस केली. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन अजित पवारांनी वळसे पाटलांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. 


पाय घसरुन पडल्याने वळसे पाटलांना दुखापत 


 दिलीप वळसे पाटील त्यांच्या घरातच पाय घसरु पडले होते. मात्र, पडल्याने त्यांना मोठी दुखापत झाली होती. वळसे पाटली यांच्या खुब्याला मार लागला होता. शिवाय, हातही फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. वळसे पाटलांना झालेले दुखापत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मोठ्या नेत्याला दुखापत झाली होती. 


आढळराव पाटलांच्या प्रचार करता येणे कठीण 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिवाजी आढळराव पाटील यांना शिंदे गटाकडून आयात करुन उमेदवारी दिली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटलांच्या विरोधात पुन्हा अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. मात्र, गेल्या वेळी ज्या उमेदवाराचा प्रचार केला. त्याच उमेदवाराचा प्रचार यावेळी वळसे पाटलांना करावा लागणार आहे. शिरुर लोकसभेतच वळसे पाटील यांचा तालुका आहे. मात्र, आढळराव पाटलांच्या प्रचारास मैदानात उतरणे वळसे पाटलांना कठिण झाले आहे.






इतर महत्वाच्या बातम्या 


Akola : अटकपूर्व जामीनासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षकाने लाखो रुपये उकळले, लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अंदाज येताच धुम ठोकली