पुणे : पुण्यात कोयता गँग, दिवसाढवळ्या मुडदे पडल्यानंतर आता शेकटो टन ड्रग्ज सापडल्याने पुणे आता मवाल्यांचा अड्डा झालं आहे का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे ड्रग्जचा उड्डा झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली. अमित ठाकरे यांनी विद्यार्थी-युवकांसह विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला.
एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार
अमित ठाकरे म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेलं असून हा खूप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. आम्ही मनसेकडून अवेअरनेस मोहिम सुरु करणार आहोत. एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाहीत यासाठी भांडतोय
अमित ठाकरे म्हणाले की, विद्यापीठाच्या स्थापनेपासून आपण मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाही यासाठी भांडत आहोत. ही शोकांतिका झाली आहे. काल पोह्यामध्ये झुरळ मिळाले. यावेळी त्यांनी फोटोही दाखवला. त्यांनी वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले. त्यांनी सांगितले की, मला प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र असून तेथील नवीन इमारती तयार आहेत, पण मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणुन उद्घाटन होत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय
त्यांनी सांगितले की, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला.
पण माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही
राज साहेब यांनी जबाबदारी दिल्यास मी ते म्हणतील ती जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. ते म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक, सरपंचही होईन, पुण्यातुनही लोकसभा लढवेल, पण माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या