पुणे : पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही करामत केली. संबंधित दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. ही घटना काल दुपारी घडली. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पुणे पोलिसांची अरेरावी करत असल्याचं म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वाधिक दुचाकी वाहनांचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर सातत्यानं या दुचाकी वाहनांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरात पार्किंगची समस्या सध्या निर्माण झाली आहे. अनेकदा पुणे वाहतूक पोलीस आणि पुणेकरांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या घटानाही समोर आल्या आहेत. अनेकदा वाहतूक पोलिसांची अरेरावी दर्शवणारे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. नानापेठ परिसरात घडलेली घटना ही त्यापैकीच एक. या घटनेवरुन अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
चौका-चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्या पुणेकरांच्या दुचाकी अडवून काही ना काही कारणं सांगून अडवणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं किंवा विनाकारण त्रास देण्याची कामं वाहतुक पोलीस करत असतात. असं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. शहरात गुरुवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलीस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरले. यावेळी वाहतूक पोलिसानं दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसांनी करणं, तरी कुठंपत योग्य आहे? अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला जात आहे. अशातच पुणे शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :