पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील लसीकरणावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. लस घेतल्याने नागरिकांचा मृत्यू होतो, असा समज झाल्याने एका महिलेने लसीकरण बंद पाडलं. चाकू घेऊन ही महिला केंद्रावर आली. लसीमुळं नागरिकांचा मृत्यू होतोय, तरी इथं लस का दिली जाते. असा प्रश्न विचारत तिने केंद्रावरील सेल्फी पॉइंट चाकूने फाडले. तर केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना खुर्ची आणि हाताने मारहाण केली.


Mumbai Vaccination : आज आणि उद्या मुंबईत लसीकरण बंद; पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरणाला ब्रेक


शिवाय काही खुर्च्या तोडत सर्वांना शिवीगाळ केली. नंतर इथं लसीकरण करू नका अशी धमकी देऊन ही महिला तिथून पसार झाली. नेहरूनगरच्या विठ्ठलनगर बिल्डिंग नंबर सहा वरील लसीकरण केंद्रावर हा धक्कादायक प्रकार बुधवारच्या सकाळी दहा वाजता घडला. संबंधित महिला विठ्ठलनगर बिल्डिंग नंबर दोन मध्ये राहते. त्याच विठ्ठलनगरच्या सहा नंबर बिल्डिंगमध्ये हे लसीकरण केंद महापालिकेने सुरू केलेलं आहे. तिच्या मनात लसीबाबत भीती आहे. अशात हे लसीकरण तिच्याच लगतच्या बिल्डिंगमध्ये पार पडत होतं.


लसीकरणाला घेऊन तिच्या मनात असल्याने संभ्रमातून तिने हे पाऊल उचललं. संबंधित महिलेविरोधात महिला कर्मचारीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली, त्यानुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. पोलीस त्या महिलेचा शोध घेतायेत. काल या गोंधळामुळं बराच वेळ बंद पडलेलं लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.