Ajit Pawar Angry: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली वक्तव्ये आणि प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात उभं करणं चूक होती आणि रक्षाबंधानाच्या कार्यक्रमावरून त्यांनी केलेली वक्तव्ये सध्या चर्चेला आली आहे. अशातच आज पुण्यात अजित पवारांना (Ajit Pawar) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर ते भडकल्याचं दिसून आलं आहे. काही दिवसांपासून त्यांना सातत्याने याबाबत प्रश्न केले जात आहेत, अशातच आज पुण्यात सुळेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते भडकल्याचं दिसून आलं. मी जाईल रक्षाबंधनाला तिकडे सुप्रिया (Supriya Sule) असेल तर तिला पण भेटेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये एकाच घरातील सदस्यामध्ये सामना पाहायला मिळाला. यावेळी महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणुकीत उतरल्या होत्या. यामध्ये सुळेंचा मोठा विजय झाला. बारामतीमधील सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही माझी चूक होती, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. तर यावेळी रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्या कबुलीवेळी मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुळे नाशिक दौऱ्यावर
त्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) यावेळी त्यांना अजित पवारांना (Ajit Pawar) राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी 'कळेल', असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील त्यांनी म्हटले. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असे त्यांनी म्हटले.