Sudhir Deshmane Viral Gym Trainer : गळ्यात साखळी (Gym Trainer) बांधून एक पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेले हे व्यक्ती जीम करताना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे तो हा पांढरी दाढीवाले व्यक्ती कुठले आहेच. त्यांचंं वय किती आहे. या पांढऱ्या दाढीवाल्या व्यक्तीला एबीपी माझाने शोधून काढले आहे. हा व्यक्ती पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधला आहे. या व्यक्तीचं  नाव सुधीर देशमाने (Sudhir Deshmane) असं आहे. 


सुधीर देशमाने यांचे वय वर्ष फक्त 50 इतके आहे. लहानपणापासून देशमाने यांना व्यायामाची आवड होती. 1990 पासून त्यांना जिमची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ते जीम करतात. इंदापूरमध्ये देशमाने यांची स्वत:चं जीम आहे. या जिममध्ये अनेक मुले जीममध्ये ट्रेन होत आहेत. स्वतः देशमाने जीममध्ये व्यायाम करत मुलांना प्रशिक्षण देतात. 


कसा असतो दिनक्रम?


सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास देशमाने व्यायाम करतात. हे करताना डायटवर त्यांचे विशेष लक्ष असते. 1990 साली देशमाने यांना जीमची आवड निर्माण झाली. 2000 साली दुखापत झाल्याने त्यांनी 12 वर्ष जिममध्ये व्यायाम केला नाही. त्यांनतर पुन्हा एकदा त्यांनी 2012 पासून पुन्हा एकदा आपला छंद जोपासला आहे.  माणूस हरला की वय हरतं, त्यामुळे माणसाने हरु नये किंवा हार मानू नये, हेच सुधीर देशमाने यांनी सिद्ध केलं आहे. 


वय तर फक्त आकडा!


देशमाने यांना व्यायाम फार आवडतो. आज त्यांचे वय 50 असून अजून 30 ते 35 वर्ष व्यायाम सुरू ठेवणार असल्याचे देशमाने सांगतात. व्यायाम हा प्रत्येकालाच गरजेचा असतो आणि व्यायाम केल्याने माणूस फक्त फिट दिसत नाही तर अनेक तंदुरुस्तदेखील राहतो. त्यामुळे मी माझ्यावर आलेल्या संकटांवर मात केली आणि पुनश्च हरिओम म्हणत व्यायामाला सुरुवात केली. व्यायामाने माणसाची बुद्धीदेखील तल्लख होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी काही वेळ देणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. 


सोशल मीडियापासून दूर असलेले देशमाने व्हायरल कसे झाले?


देशमाने यांच्या जीममध्ये अनेक तरुण मुलं ट्रेनिंग देतात. त्याच मुलांनी सोशल मीडियापासून दूर असलेले देशमाने यांचे  इंस्टाग्रामवर आकाऊंट काढले. त्यावर त्यांचं व्यायाम करताना व्हिडीओ पोस्ट केला. त्यांनतर तो व्हिडीओ व्हायरल झाला. आज इंस्टाग्रामवर या व्हिडीओची चर्चा आहे. व्यायाम केल्याने शरीर सदृढ राहते त्यामुळे सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे असा संदेश देशमाने तरुणांना देतात.


हेही वाचा-


India Weather : उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम, हिमाचल प्रदेशचं 8000 कोटींचं नुकसान; आजही मुसळधार पावसाचा इशारा