शिरुर, पुणे : अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे याचा दुरान्वये संबंध नाही. मी सरड्या सारखा रंग बदलला असता, तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? असा प्रतिप्रश्न आढळरावांनी कोल्हेंना विचारला. पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात आढळरावांनी संरक्षणाचेच प्रश्न अधिक विचारले अन स्वःताच्या कंपनीचे हित साधले. त्याअनुषंगाने आढळरावांनी पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान कोल्हेनी पूर्ण केलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याची आठवण करून दिली.


मात्र कोल्हेंनी माझ्यावर सॉफ्टवेअरशी संबंधित आरोप केले आणि पाणबुडीचे पुरावे सादर केले. त्यामुळं आरोप आणि पुराव्यांचा दुरान्वये संबंध नाहीत. शिवाय सादर केलेल्या पुराव्यांवर आठ खासदारांचे नाव आहेत. म्हणजे आम्ही आठ खासदारांनी गॅंग करून हे प्रश्न विचारले का? असा प्रतिप्रश्न आढळरावांनी कोल्हेना विचारला आहे.


कोल्हे मला आणि मतदारांना आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवतायेत. म्हणून मी प्रतिउत्तर देणार नव्हतो. पण मी जर सरड्या सारखा रंग बदलला असता तर कोल्हेंना हे सडेतोड उत्तर मी दिलं असतं का? असा प्रतिप्रश्न आढळरावांनी कोल्हेंना विचारला आहे.


अमोल कोल्हे म्हणाले होते की, शिवाजी आढळरावांनी सरड्या पेक्षा पटकन रंग बदलला. त्यांच्या या भूमिकेने सगळे सरडे संपावर गेले असावेत. अशी तिरकस टीका अमोल कोल्हेनी केली. कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानामध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत. त्यामुळं यापुढं मी कोल्हेना प्रतिउत्तर देणार नाही. आढळरावांनी ही भूमिका घेतल्यानंतर कोल्हेनी त्यांना सरड्याची उपमा दिली. शिरूर लोकसभेतील कोल्हे-आढळरावांमधील आव्हान-प्रतिआव्हानाच्या नाट्याने असा नवा रंग घेतला आहे. सुरुवातीला आढळरावांनी कोल्हेना आव्हान दिलं, मग कोल्हेनी आढळरावांना प्रतिआव्हान दिलं. पुरावे द्या अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडा, यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. 


आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच!


आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच असल्याचं दिसत आहे. त्यातच आधी कोल्हेंनी आढळराव पाटलांना डमी उमेदवार म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर मी दमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं प्रत्युत्तर आढळराव पाटलांनी दिलं होतं. त्यासोबतच दोघेही प्रत्येक सभेत एकमेकांवर विविध मुद्द्यांवर टीका करताना दिसतात. आता कंपनीच्या प्रकरणात नेमकं काया उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार


Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!