पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील सध्याच्या सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था असल्याची टीका जोशींनी केली.


सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत आदर नाही, त्याचप्रमाणे राज्य सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली.

नाट्य, चित्रपट आणि साहित्य याच्याशी या सरकारला काही देणंघेणं नाही. अशीच परिस्थिती असून आमच्या अनेक मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका अनेक कलाकारांनी केली.

पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सांस्कृतिक विभाग तसंच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला.