Pune Railway : पुणे रेल्वे विभागात विना तिकीट ( Pune Railway ) प्रवास करणाऱ्यांची (without ticket travel) संख्या वाढतच आहे. रोज शेकडो लोक विना तिकीट प्रवास (Railway) करत असल्याचं आढळून आलं आहे. मार्च (March) महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा आकडा धक्कादायक आहे. त्यामुळे आता विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून वारंवार दंडही (fine) वसूल करण्यात येत आहे.
पुणे रेल्वे विभागात मार्च महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 21 हजार 756 लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले आणि त्यांच्याकडून 1 कोटी 72 लाख 23 हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 7050 जणांना अनियमित प्रवासासाठी 40 लाख रुपयांहून जास्त दंड ठोठावण्यात आला आहे , तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 215 जणांकडून 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिल ते मार्च या 12 महिन्यांत 3 लाख 41 हज़ार 180 केसेस मध्ये 24 कोटी 65 लाख रुपयांहून जास्त दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
... तर प्रवास महागात पडू शकतो!
विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. त्यानुसार रोज आमचे सहकारी प्रवाशाची तपासनी करत असतात. ज्या प्रवाशाकडे तिकिट नाही किंवा जो प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. दरमहिन्यात तपासनी केली जात आहे. वर्षभराचीही आकडेवारी काहीच दिवसात मिळेल मात्र मार्च महिन्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. विना परवाना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1कोटी 72 लाख 23 हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 215 जणांकडून 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या नियानुसार प्रवास करावा नाही केल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक विनातिकीट प्रवास महागातदेखील पडू शकतो.