पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही अल्पवयीन पिडीत मुलगी ही गर्भवती (Crime News) राहिल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुलगी अल्पवयीन (Crime News) असल्याचे माहीत असताना देखील आरोपीने तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती गर्भवती राहिली, यावेळी आरोपीने पिडितेला लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी संयोग संजय गायकवाड (वय २४, रा. माळीमळा, लोणी काळभोर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो आणि अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मारहाण
प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका मुलीला मारहाण (Crime News) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २० वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. मुलीने ते संबंध तोडल्याने आणि पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत (Crime News) म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस आहेत.
शाळेत 19 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Crime News) पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील तब्बल 19 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. (Pune Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
आंदगाव येथील शाळेत उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना मारहाण करतो, त्यांच्याशी अश्लील (Pune Crime News) भाषेमध्ये बोलतो. शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली त्यानंतर 5 सप्टेंबरला संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्या वेळी शाळेतील 19 विद्यार्थिनींनी सदस्यांना जालिंदर नामदेव कांबळेच्या वर्तणुकीविषयी लेखी अर्ज दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.