पुणे : हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी (Pune News) आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी देणारे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर. याच शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहसनधारी सुवर्ण मंदिर, महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा आणि मागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याची घोषणा माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली आहे.


जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये 25 एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच 200 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून 80 मीटर उंचीचा स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार अशी माहिती यावेळी शरद सोनवणे यांनी दिली. 


हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, संपूर्ण जगाला रयतेचे राज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या जुन्नर तालुक्यात महाराजांचे मोठे सुवर्णमंदिर आणि जगातील सर्वात उंच पुतळा उभारणे आपले कर्तव्य आहे. सुरुवातीला ही संकल्पना आपली स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिक भार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे "श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट"ची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांचे भव्यदिव्य सुवर्ण मंदिर, पुतळ्यासह शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि पुढे देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.


कसं असेल सुवर्ण मंदिर?


सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या निसर्गसंपन्न गोद्रे गावामध्ये गावामध्ये सिंहसनधारी सुवर्ण मंदिर आणि महाराजांच्या भव्य पुतळ्यामागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. शिवरायांचा हा मंदिर परिसर खूपच आकर्षक असणार आहे, यामध्ये शिवाजी महाराजांच्या आचार विचारांवर आधारित ग्रंथालय असणार आहे. छत्रपती महाराजांच्या जिवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभागृह असणार आहे, (AMPI Theater, मंदिराच्या चौहूबाजूंनी पाण्याचा प्रवाह आणि मंदिर परिसराच्या चौहूबाजूंनी शील तटबंदी असणार आहे, संपुर्ण परिसरामध्ये भारतीय प्रजातीची वातावरणाकुलीत आकर्षक वृक्ष असणार आहेत, मंदिराच्या सुरुवातीला भव्य असे महाद्वार असणार आहे.


इतर महत्वाची बातमी-