Pune : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झालाय. काल रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय.  या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पुण्यातील एका निर्माणाधीन इमारतीत दुर्घटनेने दुखावलो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे होतील, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. 





 

माहितीनुसार काम सुरु असताना स्लॅबसाठी बनवलेली लोखंडी जाळी अचानक कोसळली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथे दहा कामगार काम करत होते. यातील पाच कामगारांचा मृत्यू झालाय. तर दुर्घटनेतील इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

 

रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून साईट वरती स्लॅब साठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

 

या साईटवर रात्री उशिरा देखील काम सुरूच होत घटना घडली तेंव्हा एकूण 10 मजूर तिथं काम करत होते त्यातील 5 जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरीत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या साऱ्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल होतं, सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचा काम पोलिस प्रशासन करत असून जखमींना ससून रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.

 

मात्र या घटनेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला परमिशन नव्हती दिली कुणी?

या साऱ्या प्रश्नांसह या कामगारांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे देखील महत्वाचं आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या :



Pune: प्रदूषकं शोषून घेणाऱ्या वनस्पतींपासून राम नदीचे पाणी शुद्ध; पुण्यातील एचव्ही देसाई महाविद्यालयाचा नाविण्यपूर्ण प्रयोग


पिंपरी-चिंचवडमध्ये 300 कोटींचे बिटकॉईन हडपण्यासाठी एकाचे अपहरण, पोलीस शिपाई मुख्य सूत्रधार असल्याने खळबळ


 Pune : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे यांचे निलंबन मागे, चौकशी सुरुच राहणार 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha