लोणावळा: लोणावळा शहरातील भर वस्तीतील एका बंगल्यावर 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला, लोणावळा शहर पोलीस स्टेशन (Lonawala City Police) हाकेच्या अंतरावर असूनही पोलीसांना या दरोड्याची खबर नाही, लोणावळ्यातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर 27 मे ला मध्यरात्री 3 च्या सुमारास वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पोत तयारीने आले होते, मात्र पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले, या टेम्पोत चोरांच्या चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या असल्याचं समोर आलं आहे. (Lonawala Crime News)

Continues below advertisement


पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश


या बंगल्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असताना ही ते भेदून या चोरांनी, मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला, आणि वॉचमन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधून, डॉ. खंडेलवाल दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली. डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा असून त्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि चिक्की व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे, या दरोड्याची कुणकुण लोणावळा पोलीसांना लागताच पोलीसांनी डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्याकडे धाव घेतली असता, पोलीसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळाले, मात्र पुढे दरोडेखोर आणि मागे पोलीसांनी फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र तो असफल होऊन दरोडेखोर चोरीची लूट घेऊन पोलिसांच्या देखत पसार झाले. 


थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 


या पाठलागचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु या चोरीच्या घटनेने स्थानिक भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून या दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलीसांनी अटक करावी, अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिला आहे. तर दुसरीकडे लोणावळा पोलीसांची चार पथके या दरोडेखोरांच्या मागावर रवाना केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट 


पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला, आणि वॉचमेन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधून, डॉ. खंडेलवाल दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.