पुणे : पुण्यात सध्या आत्महत्येच्या प्रमाणात चांगलीच (suicide) वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक्ष क्षेत्रातील आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. मात्र आता थेट दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली आणि यातच या मुलीचा मृत्यू झाला. देहू परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मोबाईल खेळण्यावरुन घरात आई-वडिलांशी वाद झाला होता. आर्याचे आई वडिल मुळचे सांगोल्याचे आहेत. ते दोघेही साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सावंत यांना दोन मुली आहेत. आर्या ही घरातली मोठी मुलगी होती. आर्याने काही कारणासाठी मोबाईल हवा होता मात्र आई वडिलांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला. हे पाहून तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट टोकाचं पाऊल उचललं. ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि थेट सातव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.
MIT कॉलेजच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील कोथरुड MIT कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बीबीएच्या तरुणाने आत्महत्या केली होती. विद्यार्थ्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. हा तरुण बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. विनीत मारु हा कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांना त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली नाही.
नैराश्येतून आत्महत्येत वाढ
सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं.
इतर महत्वाची बातमी-