Pranali Rathod New Car: प्रणाली राठोड (Pranali Rathod) ही हिंदी मालिकाविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेने प्रणालीला घरोघरी पोहचवले. ही मालिका बऱ्याच काळापासून चालत आलेली प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेत प्रणाली हर्षद चोप्राच्या बरोबर दिसली असून प्रेक्षकांना दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच आवडली आवडली आहे. नुकतच प्रणालीचं स्वप्न साकार झालं आहे. प्रणालीने नुकतीच एक नवी गाडी विकत घेतली आहे. तिच्या नव्या गाडीसोबतच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
प्रणालीने घेतली नवी गाडी
प्रणाली सध्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून तिला मिळालेल्या यशाचा आनंद घेत आहे.दरम्यान,या अभिनेत्रीने नुकतच तिच्या चाहत्यांना नवी गाडी घेतल्याची आनंदाची बातमी घेतली आहे. तिची मोठी बहीण रुची राठोड हिने प्रणालीचा नव्या गाडीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रणालीने कोणती गाडी विकत घेतली?
प्रणालीने काळ्या रंगाची टाटा हॅरियर खरेदी केली आहे. या SUV ची किंमत 15 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.प्रणालीने तिच्या कुटुंबासोबत या गाडीची पूजा केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रणालीच्या या आनंदात तिचे चाहते देखील सहभागी झाले आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनी तिला यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत मुख्य भुमिकेत
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमध्ये सुरुवातीला हिना खान आणि करण मेहरा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी या मालिकेमध्ये अक्षरा आणि नैतिकच्या पात्रांची भूमिका निभावली होती. त्यानंतर शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांनी या मालिकेत मुख्य भुमिका साकारली. या मालिकेत नायरा आणि कार्तिकच्या पात्रामुळे त्यांनी बरीच पसंती देखील मिळाली. तर सध्या ' 'ये रिश्ता क्या कहलाता है'' या मालिकेत अभिमन्यु आणि अक्षराच्या भुमिकेत हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड मुख्य भुमिकेत आहेत. प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रासोबत या मालिकेत करिश्मा सावंत आणि जय सोनी हे देखील मुख्य भुमिकेत आहेत.