Trp List Hindi Serial : 'बार्क इंडिया' प्रत्येक आठवड्याला टीआरपी रिपोर्ट जाहीर करत असतं. आता या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला असून रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्नाच्या (Gaurav Khanna) 'अनुपमा' (Anupama) या मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेने 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेला मागे टाकलं आहे. जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट...


1. अनुपमा (Anupama) : रुपाली गांगुली आणि गौरव खन्नाची 'अनुपमा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. मालिकेतील रंजक वळणांचा टीआरपीवर परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. या आठवड्यात मालिकेला 2.9 रेटिंग मिळाले आहे. 






2. ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) : 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 2.1 रेटिंग मिळाले आहे. 


3. गुम है किसी के प्यार में (Gum Hai Kisi Ke Pyar Mein) : 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडले आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये या मालिकेला 1.9 रेटिंग मिळाले आहे. 


4. फालतू (Faltu) : निहारिका चौकसेच्या 'फालतू' या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत 1.8 रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. 


5. ये है चाहते (Yeh Hai Chahatein) : 'ये है चाहते' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 1.7 रेटिंग मिळाले आहे. 


6. इमली (Imlie) : 'इमली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर आहे.  या मालिकेला 1.7 रेटिंग मिळाले आहे. 


7. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे. या मालिकेला 1.5 रेटिंग मिळाले आहे. 


संबंधित बातम्या


TRP Top Shows List: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या टीआरपीवर झाला कॉन्ट्रोव्हर्सीचा परिणाम? टॉप-10 यादीमधून बाहेर पडली मालिका