मुंबई : झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आहे. काल वांद्र येथे अजित पवार यांची जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्यासोबत पाहायला मिळाले होते. त्यांच्यात आज पुन्हा एकदा भेट झाली होती. त्यानंतर आता या भेटीत नेमकं काय घडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


झिशान सिद्दीकी यांची राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थिती


झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत सहभाग घेतला. अजित पवार यांच्या सोबतीला उभे राहात त्यांनी रोड शोदरम्यान लोकांना अभिवादन केले. तर सभास्थळी मंचावर बसून त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. आपल्या या भाषणाच्या माध्यमातून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत झिशान यांनी दिले होते. या सभेनंतर झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या कार्यक्रमानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश हा निश्चित मानला जात आहे.


...तर झिशान सिद्दीकी यांना सोबत घेऊ


याच पक्षप्रवेशावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते सुनिल तकटरे यांनी झिशानची इच्छा असेल तर आम्ही नक्की त्याला सोबत घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता बाब सिद्दीकी आणि झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. 


झिशान सिद्दीकी लवकरच राष्ट्रवादीत जाणार


या भेटीबाबत बाबा सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्याशी झालेली भेट ही शासकीय कामासाठी होती, असे स्पष्टीकरण बाबा सिद्दीकी यांनीद दिली आहे. मात्र झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांच्या हालचालींमुळे झिशान लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा :


Zishan Siddiqui : अजित पवारांना झिशान सिद्दीकींची साथ, काँग्रेसला मान्य?


Zishan Siddiqui : झिशान सिद्धीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता : ABP Majha


नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको