Prashant Kishor Congress: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे झालेल्या एका हायप्रोफाईल बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील होण्यावर चर्चा झाली आहे. यावर प्रशांत किशोर यांनी सहमती दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लवकरच याबाबत काँग्रेसकडून माहिती दिली जाऊ शकते.  


निवडणुकीत राजकीय पक्षांना सल्ला देणारी खाजगी संस्था IPAC चे माजी प्रमुख प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना सादरीकरण (PPT Presentation )केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी त्यांची योजना स्पष्ट केली. या बैठकीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, जय राम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, अजय माकन आणि केसी वेणू गोपाल हेही उपस्थित होते.


एका आठवड्यात योजना आढावा अहवाल


काँग्रेस नेते के सी वेणू गोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाचा आढावा घेण्यासाठी एक छोटी समिती स्थापन केली आहे. ही समिती आठवडाभरात आपला आढावा अहवाल काँग्रेस हायकमांडला सादर करणार आहे.


370 जागांचे लक्ष


प्रशांत किशोर यांनी आपल्या सादरीकरणात काँग्रेस नेत्यांसमोर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 370 ते 400 जागांचे लक्ष ठेवले. जिथे काँग्रेस कमकुवत आहे, तिथे काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवायला हवी, असे प्रशांत किशोर म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या: