BJP Parliamentary Board Meeting: दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बैठकीसाठी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. आज होणाऱ्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


भाजप संसदीय मंडळ ही पक्षाची सर्वोच्च संघटनात्मक मंडळ आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा हे सदस्य आहेत. या बैठकीनंतर भाजपच्या सर्व खासदारांची दुसरी बैठक होणार आहे.


द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली 


तत्पूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना आधीच मैदानात उतरवले आहे. भाजपने आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केल्यानंतर आता पक्ष उपराष्ट्रपतीपदासाठी अनुभवी चेहऱ्याची निवड करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील. 2017 मध्ये भाजपने तत्कालीन कॅबिनेट मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: