बीड : मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातील सभांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बहिण पंकजा मुंडेंसाठी (Pankaja Munde) यंदा धनुभाऊही प्रचारात सक्रीय झाले असून बीड जिल्ह्यातील जनतेला महायुतीच्याच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, गतवेळी ज्या बजरंग सोनवणेंना धनंजय मुंडेंच्या शब्दामुळे उमदेवारी देण्यात आली होती, तेच बजरंग सोनवणे आता पंकजा यांच्याविरुद्ध लोकसभेच्या रणांगणात आहेत. त्यामुळे, धनंजय मुंडे (Dhananajay Munde) सोनवणेंविरुद्धही आक्रमक भाषण करताना दिसून येतात. नांदूरघाट येथील प्रचारादरम्यान, पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण होत असल्याचं म्हटलं आहे.


बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज नांदूरघाट येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेनी संबोधित केले. पंकजा मुंडे यांनी केज तालुक्यातल्या नांदूर घाट या ठिकाणी प्रचार सभा घेतली. त्यावेळी, राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. राम राज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं राज्य निर्माण केलं, त्यांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांचं संरक्षण झालं, तर स्त्रियांनाना देखील सन्मान मिळाला. तसेच, याच राज्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली. मात्,र सध्या याच महापुरुषांच्या महाराष्ट्रात राजकारण व राजकारणाची दशा आणि दिशा बदलली आहे. सध्या राजकारण पुढे चाललो आहे की मागे? असा प्रश्न पडतो अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. तर, धनंजय मुंडेंनीही बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण होत असल्याचं म्हटलं आहे.


धनंजय मुंडेंनी याअगोदरही पंकजा मुंडेंसाठी घेतलेल्या सभेत बजरंग सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाष्य केलं होत. त्यानतंर, आता बीडमध्ये सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणावरुन धनंजय मुंडेनी खंत व्यक्त केली. राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, त्या ठिकाणी वेगळं वातावरण आहे, एवढेच नाही तर बीडच्या बाजूलाच असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये देखील जातीपातीचे राजकारण होताना दिसत नाही. मग, फक्त बीडमध्येच जातीच्या मुद्द्यावर वातावरण का निर्माण केले जाते असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. इतर मतदारसंघात मराठा, ओबीसी असा वाद पाहायला मिळाला नाही. मग, बीड जिल्ह्यामध्येच हा वाद का निर्माण केला जातोय, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी विरोधक व मतदारांना उद्देशून विचारला आहे. 


म्हणून परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी बसवलं : बजरंग सोनवणे


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदुर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. हे दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला. मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. परळी मतदारसंघातील लोक हे शरद पवार यांच्या विचाराला मानणारे असून सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही बोलण्याचा ताळा सुटला आहे, त्यामुळे त्यांनी विचार करून बोलावं असेही सोनवणेंनी म्हटले. 


हेही वाचा


Raj Thackeray: राज ठाकरे सकाळी किती वाजता उठतात?; मनसे अध्यक्षांचं मिश्कील उत्तर, झोपेवरही गाढा अभ्यास