Devendra Fadnavis On Mantralaya Incident: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेने गोंधळ घातल्या प्रकरणात मंत्रालयातील दोन पोलीस दोषी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे दोन्ही पोलीस त्या दिवशी सचिवालयाच्या गेटजवळ गस्तीला होते. गोंधळ घालणाऱ्या महिलेकडे पास नसताना ती त्या गेटने आत कशी शिरली?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोन्ही पोलीस शिपाईंवर आज कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेशहे वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणारी महिला कोण?
-देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे आहे.
-तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण आहे. सदर महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे.
-सदर महिला घरी एकटीच राहते. सदर महिलेच्या आईवडिलांचं निधन झालं असून बहिणीचं लग्न झालं आहे.
-सदर महिलेने याआधी भाजपच्या कार्यालयात देखील गोंधळ घातला होता.
-सदर महिलेचं राहत्या सोसायटीमध्ये देखील अनेकवेळा भांडणं झाली आहेत.
-अनेकवेळा सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरताना देखील दिसून आली.
-घराच्या शेजाऱ्यांच्या दरवाजावर झाडून मारताना देखील सदर महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.
-याआधी सदर महिला अनेकवेळा मंत्रालयात आली असल्याची माहिती
-बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा नंबर द्या...लग्न करायचं आहे, अशी तिची मागणी
-अनेक राजकीय नेत्यांना फोन करुन सलमान खानचा नंबर मागते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सदर महिलेचे काय म्हणणं होते तिने कशा करता हे केले ते आम्ही निश्चितपणे समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेने तीने हे केले आहे का? तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ आणि ती व्यथा दूर करण्यास आम्ही प्रयत्न करू. महिलेला कुणी पाठवले याची माहिती घेणार आहे, असे त्यांनी म्हटले.