Walmik Karad, Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मकोका लागलेल्या वाल्मिक कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, वाल्मीक कराड ज्या आयसीयूमध्ये उपचार घेतोय तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाल्मीक कराडच्या (Walmik Karad) सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय. याविषयी आमदार सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर असं असेल तर हे योग्य नाही, मी रुग्णालय प्रशासनाशी यासंदर्भात बोलेन, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुरेश धस (Suresh Dhas) यांनी व्यक्त केली आहे. 


सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी जो खून झाला आहे, त्याचा तपास लागत नाहीये.. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा..भदाणे, केंद्रे ही ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.. यांना पण आकाने बसवलं आहे..महादेव मुंडे प्रकरणी पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा केली. मुंडेंचे खूनी पुढच्या 15 दिवसांत सापडले पाहिजे. बीड जिल्ह्यात पोलिस दल पुर्ण बदनाम झालंय..कराडला कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडचा पीए कसा बसेल त्याची काळजी पण बल्लाळ घेत होते. महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा सुशील कराड आणि श्री कराड दोन मुलांनी पोलिस निरिक्षक रविंद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकावर अर्धा तासांत 150 वेळा फोन केलाय..


खून झाला तेव्हा हे फोन का केले गेले? याचा तपास झाला पाहिजे. मी आरोपी मानत नाही पण 150 कॉल करण्याची गरज काय? मुंबईवरुन दुबे नावाचे सायबर तज्ज्ञ आहेत.. त्यांनी त्यांचं मत नोंदलेलं आहे, असंही धस यांनी म्हटलं आहे. 


बीड वाल्मीक कराडची वैद्यकीय माहिती. 


- 22 तारखेला वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
- पोटात दुखत असल्याने गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता जिल्हा कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 
- मध्यरात्री उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी रक्त-लघवी तपासणीसाठी नमुने घेतले..
- या तपासण्यांचे अहवाल आज येणार. 
- 22 तारखेला वाल्मीक कराड यांचे रेगुलर चेकअप मध्ये.. सर्दी ताप आणि खोकला असल्याचे वैद्यकीय पथकाचे म्हणणे..
- सध्या वाल्मीक कराड वर जिल्हा रुग्णालयात वार्ड नंबर सहा मध्ये उपचार सुरू..
- आज त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांची माहिती..


मकोका कारवाईतील चार आरोपींची होणार ओळख परेड


सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींची होणार ओळख परेड होणार आहे. हे आरोपी मकोका सह सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील देखील आरोपी आहेत.. ही ओळख परेड बीड कारागृहात पार पडणार आहे


भाजप आमदार सुरेश धस उद्या सकाळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आहेत. सकाळी 11 वाजताची त्यांनी अधीक्षकांकडे वेळ मागितली होती. देशमुख हत्या प्रकरणासह इतर प्रश्नांवर सुरेश धस यांची चर्चा झाली आहे. देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत त्या अनुषंगाने देखील धस यांची अधीक्षकांसोबत चर्चा झाली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, 40 वर्ष सोबत असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; 'ऑपरेशन धनुष्यबाण'ला सुरुवात?