Supriya Sule : प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, खाली हाथ आये थे खाली हात जायेंगे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. इलेक्शन येतात आणि जातात पण रिश्ते हमेशा रहते है असंही सुळे म्हणाल्या. मी कोणत्याही पदासाठी महत्वकांक्षी नाही. पण हे अनेकांना पटत नाही असेही सुळे म्हणाल्या. त्या कोल्हापुरमध्ये बोलत होत्या. 


माझ्या निवडणुकीत हे लक्षात आलं की कोणी आपल्या सोबत नसलं तरी चालेल पण जनता आपल्या सोबत असायला हवी, तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही असे सुळे म्हणाल्या. सगळी यंत्रणा माझ्या विरोधात होती. आमदार, खासदार, सरपंच सुद्धा माझ्यासोबत नव्हते. तरी जनतेनं मला निवडून आणलं असे सुळे म्हणाल्या. 


शरद पवार हे कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही


माझ्या वडिलांचे (शरद पवार) कोल्हापूरवर मोठं प्रेम असल्याचे सुळे म्हणाल्या. आमचे वडील कधी रिटायर्ड होतील असं अनेकांना वाटतं. पण ते कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही असेही सुळे म्हणाल्या. आबिटकर साहेब तुमचा पक्ष फुटला कारण नेते वेळ देत नाहीत म्हणून आणि आमचा पक्ष फुटला नेते जास्त वेळ देतात म्हणून असेही सुळे म्हणाल्या. खात्यातील फाईलींबद्दल बोलायला अभ्यास लागत नाही, इतिहासावर बोलायला जास्त अभ्यास करावा लागतो असे सुळे म्हणाल्या. मला आता ऐकायला शिकवलं आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्यात खूप शक्ती लागते असे सुळे म्हणाल्या. म्हणूनच मी लोकसभेला जिंकलो आहे. आरे ला का रे केलं असतं तर निवडून आलो नसतो असेही सुळे म्हणाल्या. 


महाराष्ट्र सरकारने ताराराणी यांचे धडे पुस्तकात आणले पाहिजेत


महाराष्ट्र सरकारने ताराराणी यांचे धडे पुस्तकात आणले पाहिजेत असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. केवळ पुतळे बांधून आणि मालिका तयार करून चालणार नाही असंही त्या म्हणाल्या. हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. कितीही लढू पण हा देश संविधानाने चालवू असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील सुळेंनी प्रतिक्रिया दिली. गुन्हा करणारा जितका दोषी असतो तसा गुन्हा सहन करणारा देखील दोषी असतो. बीड प्रकरणात आपण गप्प बसलो तर चालणार नाही असेही सुळे यावेळी म्हणाल्या. 


महत्वाच्या बातम्या:


भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करतायेत, सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, सरकारनं हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर