Vishwajeet Kadam at Majha Vision : काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) भाजपमध्ये प्रवेश करतील, असे आरोप सांगलीत गेल्या दोन महिन्यांपासून केले जात होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी विधीमंडळाबाहेर झालेल्या संवादानंतर सातत्याने विश्वजीत कदम भाजपात जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी 'एबीपी माझा'च्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाष्य केलं आहे. 


काय म्हणाले विश्वजीत कदम ?


विश्वजीत कदम म्हणाले, मी भाजपात जाणारे हे कशाच्या आधारे बोलले जाते? जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली. त्यावेळी राहुल गांधींसोबत 325 किलोमीटर केवळ दोन नेते चालले. अनेक कार्यकर्ते चालले, अनेक नेते चालले. त्यांच्याबाबत मला आदर आहे. प्रत्येकजण आपल्या तब्येतीनुसार चालले असेल. मी नांदेडपासून बुलढाणापर्यंत त्यांच्यासोबत चाललो. मी जर राहुल गांधींसोबत 300 किलोमीटर चालत असेल तर भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवालही विश्वजीत कदम यांनी केला. 


दोन महिन्यांचा कालावधी कठिण होता, संघर्षाचा होता


विश्वजीत कदम म्हणाले, दोन महिन्यांचा कालावधी उत्सुकतेचा होता. कठिण होता, संघर्षाचा होता. शेवटी काही क्षणाकरिता निराशेचा देखील होता.  एखाद्या व्यक्तिमत्वाला जेव्हा एखादी गोष्ट हवी होती. त्यांची ती इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जे करावं लागतं ते मी करत होतो. शेवटी त्याला अचानकपणे एक वेगळं वळण आलं. त्यानंतर ज्या भावना एखाद्या व्यक्तीला जाणवतात, त्या सगळ्या भावनांमधून मी गेलो आहे. मी सांगलीच्या जागेसाठी लढत होतो, तो मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मानणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 


सांगलीत काँग्रेस पक्षाचेचं खासदार निवडून आले आहेत


पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, सांगलीत काँग्रेस पक्षाचेचं खासदार निवडून आले आहेत. तिथे आम्ही दोन काँग्रेस पक्षाचे आमदार होतो. तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 1 आमदार आहेत. त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या 3 आमदार तिथे महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी माझी व्यक्तीगत नाही, तर सांगलीतील सामान्य लोकांची देखील भावना होती. मी सर्वांची भावना प्रकर्षाने मांडत होतो. सुरुवातीला मी नम्रपणे मांडत होतो. कारण पक्षाला विनंती करण्याची ती एक पद्धत असते. 


सांगलीतील उमेदवारीची इनसाईड स्टोरी,विश्वजीत कदमांची Exclusive मुलाखत



इतर महत्वाच्या बातम्या 


राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, मुख्य इव्हेंटपूर्वी करमणुकीचं काम करतात; एका इव्हेंटचे किती पैसे घेतात? विजय वडेट्टीवार