अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 4 जूनपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, त्यांची तब्येत ही खालावलेली असून डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये असं असा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत असा अशी भूमिका अहमदनगर येथील मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आहे.


मराठा आंदोलक म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मागील आठ महिन्यांपासून आंदोलन उभे केले. मात्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सरकार ठोस भूमिका घेत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 4 जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 


लोकसभेतून मराठा समाजाची ताकद दिसणार


डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. एक दिवस देखील उपोषण करू नये असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आता लोकसभेतून मराठा समाजाची ताकद काय आहे, हे सरकारला कळेलच. 


मराठा समाज खंबीरपणे मनोज जरांगेंच्या पाठीशी 


मराठा बांधव म्हणून मनोज जरांगे साहेबांना आमची मागणी आहे की, त्यांनी उपोषण करू नये. तुम्ही रस्त्यावर उतरून लढण्याचे आदेश द्या, तुमच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील. तुम्ही जी रणनिती ठरवाल त्याचे मराठा समाज पालन करेल. मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या तब्येतीमुळे आंदोलन करू नये, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली. 


4 जूनपासून उपोषण सुरु करणार - मनोज जरांगे


उपोषणाची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाचेही नाही. यामुळे मुलांचे वाटोळे झाले आहे. 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेलेनाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


''चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम' भांग पाडून फिरत असतात''; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली