नागपूर : राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (PM Modi)  शपथ घेतली. राज्यात मोदींच्या शपथविधीची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा  अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांना टोला लगावला आहे. मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा टोला  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay wadettiwar)  केला आहे.  महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते.


विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित दादांना जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न केले पण अपयश आले. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो.अजित पवारांची स्थिती  सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही,जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे .


उपयोग झाला की फेकून द्यायचं ही भाजपची नीती: वडेट्टीवार


भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना समजलं तसं ते दूर गेले. भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.


अजितदादा किंवा शिंदे यांचे 40 आमदार घरवापसी करतील: वडेट्टीवार


शिंदेंच्या आमदार घरवापसीवर वडेट्टीवार म्हणाले,  गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. बोलायला जागा नाही,ही गद्दारी शिक्का लागलेली मंडळी आहेत. पार्टी संपली आहे, गेलेले अजित दादा किंवा शिंदे यांचे 40 आमदार घरवापसी करतीलअशी परिस्थिती आहेत. संपर्क साधत असल्याची माहिती आहे. चर्चा जोरात आहेत कारण वारे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.


भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा निषेध


भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणाचा समावेश आहे का याची माहिती सरकारने घ्यावी, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. 370 कलम हटवून काय झाले,किती काश्मिरी पंडित घरवापसी झाली? 10 लोकांचा जीव जातो,मोदी फार काही करू शकले नाही, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.  


नीटची परीक्षा रद्द करा, वडेट्टीवारांची मागणी


नीट परीक्षेवर वडेट्टीवार म्हणाले,  मी नीटची परीक्षा रद्द करण्याची मागणी केंद्राकडे केली आह. नीट होऊ नये असं मुश्रीफ म्हणतात. महाराष्ट्राच्या पोरांचे नुकसान झाले आहे,पुन्हा परीक्षा घ्या. विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करता येणार आहे. 


हे ही वाचा :


राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मंत्रिमंडळातला सहभाग का खोळंबला? समोर आलं मोठं कारण